भंडारात काँग्रेसचा ‘ब्लैक डे’

राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या नेत्यावरील कारवाईचा निषेध * काळ्या फिती लावून आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस नेते खा. राहुल गांधीसह इंडिया INDIA आघाडीच्या नेत्यावरील कारवाईच्या निषेधार्थ ८ ऑक्टोबर हा ‘Black Day for Indian Democracy’ म्हणून पाळण्यात आला. त्यानिमित्त भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, भंडारा शहर काँग्रेस कमिटी आणि भंडारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या धोरणांचा तसेच दिल्लीतील आंदोलन दरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदविला.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीतील विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया अर्थात Special Intensive Revision (SIR) संदर्भातील प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांच्या नेतृखालील इंडिया आघाडीच्या खासदारांनी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले. ७ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरकडे जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ देशभर ‘ब्लैक डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

भंडारातील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देत निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांच्या अधिकाराबाबत पारदर्शकता राखण्याची मागणी केली.

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि संवैधानिक संस्थांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पारदर्शकपणे उत्तरे मिळणे आवश्यक आहे. प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला दडपण्याऐवजी त्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, हे आंदोलन केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून संविधान, लोकशाही आणि मतदारसंघांच्या अधिकारासंबंधी मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे संबंधित संस्थांनी समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे.

धनराज साठवणे यांनीही निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या आंदोलनाकडे केवळ राजकीय संघर्ष म्हणून न पाहता त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. मतदार यादी, रक्क आणि निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता व स्पष्टता असणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीतील कारवाईचा निषेध करण्यात आला असला तरी निवडणूक आयोग आणि भाजपकडून काँग्रेसच्या आरोपांना नकार देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीबाबत कायदेशीर व निर्धारित प्रक्रियेनुसार काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

आंदोलनात मुकुंद साखरकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अभिजोत वंजारी, रिजवान काशी, राजकपूर राऊत, मनोज वागडे, वैभव मेंढे, नरेंद्र साकोरे, किशोर राऊत, नवाब पटेल, हिरामण लांजेवार, आयुब पटेल, शमीम शेख, इम्रान पटेल, शीलवंत मडाμε, जीवन कावडे, सुरेश कोटेखावे, फारुख खान, भाऊ कातोरे, सुरेश गुंभाडे, प्रमोद मानापुरे, पवन बंजारी, विनीत देशपांडे, मधुकुर कुंभाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *