समुदाय संसाधन व्यक्तीच्या मानधन निधी वितरित; खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांना यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती ग्रामीण भागात स्वयंसहायता गटांना व बचत गटांना मदत करण्याचे कार्य करीत असून ग्रामीण भागातील लोकांचे व विशेषतः महिलांचे जीवनमान उंचावून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम काव्यात या हेतूने साधन व्यक्ती मदत करण्याचे कार्य करीत असतात. याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने मानधन देण्यात येते. ग्रामीण भागातील लोकांची उन्नती व प्रगती व्हावी या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाच्या समुदाय संसाधन व्यक्तीना मागील मार्च महिन्यापासून राज्य सरकारच्या वतीने देण्यात येत असलेला मानधन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा व कार्यक्रमांच्या उद्देशावर परिणाम होत होता.

नुकतेच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी आलेले असताना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत कार्यरत साधन व्यक्तींनी भेट घेत प्रलंबित मानधनाची समस्या मांडली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांना संपर्क साधून समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश दिले होते. याची तात्काळ अंमलबजावणी करीत आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी निधी वितरित करण्याचे आदेश काढले असल्याने खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *