सरसकट शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ‘फसवी’ असल्याचा आरोप करत व रब्बी हंगामातील धानाचे थकीत ६०० कोटी रुपये त्वरित देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी भंडारा शहरात जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांचं नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक काळात कोणत्याही अटीशर्तीशिवाय सरसकट कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेली कर्जमाफी फसवी असून शेतकºयांच्या ७/१२ कोरे करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पक्षाने केली. महायुती सरकारने केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली मोहीम आहे.

२०१९ मध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कॅबिनेटची वाट न पाहता २ लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले होते, त्याच धर्तीवर आताही निर्णय घ्यावा, आणि सरसकट कर्ज माफ करून शेतकºयांना कर्जमुक्ती द्यावी,असे निवेदनात नमूद आहे. पीक विमा व थकीत धानाचा मुद्दा राज्य शासन शेतकºयांसाठी पीक विमा योजना जाहीर करते, परंतु नुकसानग्रस्त शेतकºयांना दोन अंकी, तीन अंकी आकड्यात पीक विम्याची रक्कम देऊन विमा कंपन्यांना कोट्यवधी रुपये कमावून देण्याचे ‘महापाप’ सरकार करत असल्याचा आरोप करण्यात आला. रब्बी हंगामातील उन्हाळी धानाचे जवळपास ८०० कोटी रुपये शासनाकडे देणे होते. त्यापैकी फक्त २०० कोटींचे चुकते शेतकºयांना देण्यात आले असून अद्यापही ६०० कोटी रुपये थकीत आहेत. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकºयांना पदोपदी पैशांची गरज आहे. थकीत रक्कम न दिल्यास हा शेतकºयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेने केला.

मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चाचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाºयांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने भविष्यात जिल्ह्यातील शेतकºयांना घेऊन मुंबईतील ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल. जर सरसकट कर्जमाफी शक्य नसेल तर दिलेले ७/१२ करू कोरा कोरा चे आश्वासन ‘चुनावी जुमला’ होता हे जाहीरपणे सांगून शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती”, ‘धानाचे चुकारे लवकर द्या,

लवकर द्या’, पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळालाच पाहिजे, किसानो के हित मे शिवसेना मैदान मे, उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मुर्दाबाद मुर्दाबाद महायुती सरकार मुर्दाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्किट हाऊस येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वय सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, प्रमोद मेश्राम, दिनेश नंदापुरे, मधु बुराडे, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, विधानसभा संघटक शोभाराम तिजारे, शहरप्रमुख राकेश आग्रे, प्रवीण गुप्ता अरविंद अंबादे, चित्रागंध सेलोकर, गोपीचंद गोमासे, सुशील बावणे इत्यादी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *