भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
गोंदिया:- जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मासुलकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गाचा स्लैब आज गुरुवारी दुपारी अचानक खचल्याने प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने, इमारतीचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गाबाहेर व्ह्राइंयात शिक्षण घेत असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटेनेमुळे जि. प. शाळांच्या दुरवस्थेचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुपारी शाळा सुरू असताना काही शिक्षक प्रशासकीय कामासाठी वर्गात बसले होते. त्याचवेळी अचानक वर्गखोलीच्या છताचा स्लैब खाली कोसळला. सुदैवाने शिक्षकांना दुखापत झाली नाही. मात्र, हाच स्लैब नेहमीप्रमाणे विद्यार्थी आत बसलेले असताना कोसळला असता, तर मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागले असते, या कल्पनेनेच पालक आणि ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे.
प्रशासकीय अनास्थेवर ग्रामस्थांचा संताप मासुलकसा येथील या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षक कार्यरत आहेत. इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची माहिती आणि तक्रारी यापूर्वीच संबंधित शिक्षण विभाग व पंचायत समितीकडे वारंवार करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. प्रशासकीय आश्वासनांच्या कागदावरच आमच्या मुलांची सुरक्षतता अडकली आहे का? असा संताप सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. मुलांच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. एखाدی मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संताप सवाल करत, जोपर्यंत नवीन आणि सुरक्षित जागेची सोय होत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.