भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाºया प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कला, संगीत व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा वेळोवेळी गौरव करण्यात येतो. नुकताच अकोला येथे राज्यस्तरीय सत्कार समारंभ पार पडला होता. मात्र, त्या समारंभास भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काही सत्कारमूर्ती उपस्थित राहू शकल्या नसल्याने त्यांचा स्वतंत्र सत्कार करण्यात आला. याच अनुषंगाने उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल तुमसर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीरा भट यांचा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सौ. लीना फलके (ढेंगे) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी तसेच संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीमती मीरा भट यांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या सामाजिक कायार्चा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सौ. मीरा भट यांनी समाजहितासाठी केलेल्या कायार्चे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.