आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे: संदीप बावनकुळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत पंचशील वार्ड येथील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात जनआरोग्य समितीची सभा नगरसेवक समितीचे अध्यक्ष तथा गटनेते इंजि. संदीप बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कृणाल कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. सभेत केंद्रामार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाºया विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी माता व बाल आरोग्य, नियमित लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, कुटुंब कल्याण, पोषण आहार तसेच परिसर स्वच्छता या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात नगरसेवक संदीप बावनकुळे यांनी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या सर्व योजना व सेवा प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आरोग्य निरीक्षक वाय. टी. भेंडारकर, नगरसेविका मेघा बडवाईक, जि.प. सदस्य वनिता डोये, तालुका प्रतिनिधी मारयांडे सर, आरोग्य सेविका आर. ए. वासनिक, आर. ए. चचाने, पी. जे. देशमुख, आरोग्य सेवक शुभम भोयर, आशा सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *