शहरातील चार पदरी रस्त्यालगतचे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट, क्युरींगचा अभाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाच्या कामाचा भाग म्हणून नालीचे बांधकाम सुरू आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या नाली बांधकामावर योग्य प्रकारे क्युरींग होत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) च्या वतीने करण्यात आले असून याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

मुजरी ते कारधा ह्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सिमा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट मिळवून सुरू केलेले आहे. सध्या रस्त्याच्या बाजूला नागपूर नाका ते जि. प. चौक दरम्यान दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु काँक्रिटचे काम झाल्यानंतर या काँक्रिटवर योग्य प्रमाणात दिवसातून दोन ते तीनदा क्युरींग करणे आवश्यक आहे. त्याशिवाय बांधकामाला मजबुती येणार नाही. परंतु सिमा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांना या गोष्टीचा बहुधा विसर पडला असावा, त्यामुळेच या तयार झालेली नाली दिवसा कधीही बघितले तर ती पूर्णपणे कोरडीच दिसते, त्यामुळे बांधकाम हे भविष्याच्या दृष्टीकोनातून बघितल्यास अतिशय निकृष्ट दर्जाचे होऊन क्युरींग अभावी हे बांधकाम दर्जामीन होऊन भविष्यात याचा भुर्दंड आसपासच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना होऊन शासनाच्या लाखो रुपयांचा निधीचा चुराडा होईल.

या सिमा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट खुप जास्त Below जावून घेतल्यामुळे कंपनीचे मालक ह्या रस्त्याचे बांधकाम करतानी खुप जास्त रस्त्याची, बांधकामाची गुणवत्ता, दर्जा न जोपासता लवकर लवकर काम पुर्ण करून बस्तान गुंडाळण्याच्या तयारीरीत आहे असे खाजगीत दबक्या आवाजात चर्चा आहे. हे जर खरोरे असेल तर भविष्यात याचे वाईट परिणाम भंडारा शहरवाद्यांना भोगावे लागुन शासनाला चुना लावण्याचे काम करण्याचा हा प्रकार होईल.

करीता सिमा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तर्फे सुरु असलेल्या कामातुन दर्जा जोपासण्याचे आणि सुरु असलेल्या काँक्रिटच्या बांधकामावर योग्य प्रकारे दिवसातुन किमान दोन ते तिनदा क्युरींग करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षातर्फे शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, राजेश ठवकर, विभाग प्रमुख नितेश गभणे, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाळे, संतोष चांदीवार, अनिरुद्ध गाढवे, मोनू हेडाऊ, धर्मेंद्र डोमणे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *