श्रावण सखींनी नऊवारीत रंगवला श्रावण सोहळा

मोरेश्वर बिसने /भंडारा पत्रिका तुमसर : लोकमत सखी तुमसरतर्फे स्थानिक दिनानाथ मंगल कार्यालयात सखींसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांसह महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत श्रावणाचा आनंद लुटला. कार्यक्रमात श्रावण क्वीन स्पर्धेत मौसमी पडोळे यांची श्रावण क्वीन म्हणून निवड करण्यात आली. विवेक ठाकरे यांनी श्रावण क्वीन स्पर्धेतील परीक्षकाची व वर्षा मलेवार आनि प्रिती तंगडपल्लीवार यांनी सुपारी, नारळ डेकोरेशन परिक्षकाची भूमिका पार पाडली. तसेच साडी परिधान, सुपारी डेकोरेशन आणि नारळ डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आल्या. श्रावण क्वीन स्पर्धेत सखींनी नऊवारी साडी व पारंपरिक दागिने परिधान करून आकर्षक सादरीकरण केले. टॅलेंट राऊंडमध्येही सखींनी विविध कलांचे प्रदर्शन केले. प्रश्नमंजुषा फेरीत बुद्धिमत्ता सिद्ध करून मौसमी पडोळे यांनी बाजी मारली.

मुकुट व श्रावण क्वीनचा टॅग देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मागील वर्षीच्या श्रावण क्वीन मिनल लिमजे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत अंजुश्री उरकुडे यांना बेस्ट नववारीसाठी, पूर्वा बांगरे यांना बेस्ट रॅम्प वॉक आणि तनुश्री रहांगडाले यांना बेस्ट स्माईलसाठी पारितोषिक देण्यात आले. साडीपासून निर्मित परिधान स्पर्धेत पल्लवी निनावे प्रथम, संगीता लहाणेत्रे द्वितीय तर पूजा नानतावणीला तृतीय क्रमांक मिळाला. आशा बनसोड, प्राची हटवार, कल्पना थोटे आणि नेहा मोटघरे यांना सांत्वना पारितोषिक मिळाले. सुपारी डेकोरेशनमध्ये निमा रिनाईट प्रथम, अर्पणा मते द्वितीय तर पल्लवी निनावे तृतीय ठरल्या. नारळ डेकोरेशनमध्ये तनुश्री रहांगडाले प्रथम, रंजना ठाकरे द्वितीय तर अर्पणा मते तृतीय आल्या. ओशाळ बावनकर आणि श्रद्धा हेडाऊ यांना सांत्वना पुरस्कार मिळाला.हिरवी साडी परिधान स्पर्धेत लक्ष्मी क्रुपान आणि काजल उइके यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला कल्याणी भुरे, रोशनी भाटे, जयश्री गोस्वामी, शोभा सहारे, प्रमा सोनकर, तेजस्वी मेघ्राम, नैना येरेणे, नीतू चौधरी, मयुरी ढोके, मोनिका कोसरे, ममता बोंडगुडे, शालू परिने, नमिता परिने, ललिता शहारे, पिंकेश्वरी बिसेन, हर्षना वढाणे यांच्यासह मोठ्या संख्येने सखी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन तालुका प्रतिनिधी रितू पसिने यांनी केले, तर आभार अर्चना डुंबरे यांनी मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *