उभ्या ट्रकला दुसºया ट्रकची धडक, चालक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : डिझेल संपल्याने उड्डाण पुलावर दुभाजकाचे कडेला विजेच्या खांबाखाली उभ्या ट्रकला भरधाव वेगाने येणाºया दुसºया ट्रक ने मागेहून धडक दिल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (ता.१३) पहाटेच्या सुमारास लाखनी उड्डाण पुलावर उघडकीस आली आहे. रंजनकुमार यादव (२५), रा. बिहार असे मृतक ट्रक चालकाचे नाव आहे. गौतम रामा मेश्राम (५०) रा. भिलेवाडा हा त्याचा ट्रक क्रमांक एमएच ४९ एटी ११५५ मध्ये सिमेंट भरून नागपूर कडे जात असताना लाखनी उड्डाण पुलावर डिझेल संपल्यामुळे लाखनी उड्डाण पुलाचे वर दुभाजकाचे कडेला लाईट खाली थांबला असता मगेहून मृतक ट्रक चालक रंजनकुमार यादव याने त्याचे ताब्यातील ट्रक क्रमांक डब्ल्यूबी २३ डी ४८१४ भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रक ला मागेहुन धडक दिली व स्वत:चे मरणास कारणीभूत झाला. गौतम मेश्राम याचे तक्रारीवरून वरून लाखनी पोलिसांनी मृतक ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.