समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लवकरच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपूर येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीत, बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचे लवकर उद्घाटन होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानच येणार आहेत. आम्ही त्यांची तारीख मागितली आहे. मात्र, महामार्गाचे अजूनसुद्धा काही छोटे-छोटे काम बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही तारीख निश्चित करू, असेही ते म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तन दिन पवित्र दिवस आहे. त्या दिवशी मोठ्या संख्येने लोक येतात. मात्र, आपल्या राजकीय फायद्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांचा वापर करणे योग्य नाही. त्यामुळे येणाºया लोकांच्या जीवितालासुद्धा धोका होऊ शकतो. पोलिसांनी जी कारवाई केली ती नियमाप्रमाणे आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होणारी कामे दर्जेदार व्हावीत तसेच ही कामे गुणवत्तापूर्णच असावीत, याची जबाबदारी अधिकाºयांनी घ्यावी, असे प्रतिपादन नागपूरचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आजच्या बैठकीला मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाºयांनी अतिशय जबाबदारीने निधीसंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच, गुणवत्तेसोबत कोणत्याही पद्धतीची तडजोड करू नये, याबाबतची जबाबदारी आपली असेल असे स्पष्ट शब्दात सांगितले. तर डीपीसीचा खर्च शेवटच्या महिन्यात होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२१-२२ मार्च अखेरपर्यंत झालेल्या ६६८.८८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. तर २०२२-२३ या वर्षाकरिता जिल्ह्यातील विविध विभागाने सादर केलेल्या ८५८.७२ कोटीच्या नियतव्यय अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये २०२१-२२ मार्च अखेरपर्यंत झालेल्या खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली. सन २०२२-२३ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात आला. पुढील आर्थिक वर्षात करण्यात येणाºया खर्चा संदर्भात विभाग प्रमुखांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीदरम्यान, काही खर्चाबाबत आमदारांनी आक्षेप घेतला. ज्या ठिकाणी आक्षेप आहेत ते तपासून बघितल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्य भारतातील महत्त्वाचे उपचार केंद्र झालेल्या नागपूर येथील मेडिकल कॉलेज व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या पायाभूत सुविधा, विशेषत: डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था अद्यावत करणे, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांना आर्थिक पाठबळ देणे, विहिरी, तलाव व अन्य पायाभूत जलसंधारणाच्या सोईसुविधांना पुन्हा उभे करणे यासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरातील ४३ हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क, शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या प्रश्नासंदर्भात आमदारांसोबत ऊर्जा विभागाची एकत्रित बैठक घेणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या बांधकामाला निधीची कमतरता पडणार नाही. क्रीडा साहित्य, व्यायामाचे साहित्य दर्जेदार राहावे, यासाठी प्रक्रियेवर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालतील. बचत गटासाठी शहरांमध्ये मॉल तयार करण्याच्या कार्यपूर्तीचा निश्चित कालावधी आखण्याची सूचना त्यांनी केली. नव्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *