सभापतिपदावर कॉग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ९ जागा जिंकून ग्रामीण भागात आपली पकड घट्ट असल्याचे दाखवून दिले. तर राष्ट्रवादीने नरखेड, काटोल आणि हिंगणा पंचायत समितीवर झेंडा फडकविला. तर शिंदे गटाचे आशीष जायस्वाल यांनी रामटेक पंचायत समितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणला. भाजपला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. मात्र, कुही, मौदा आणि रामटेक येथे उपसभापती पदावर विजय मिळविला आहे.सभापती पद एससी प्रवगार्साठी राखीव होते. सभापती पदासाठी कॉग्रेसच्या वनिता मोटघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या विजयी झाल्या. उपसभापतिपदी भाजपचे बाळूभाऊ(इस्तारी) रोघोजी तळेकर यांनी निवडून आले. ईश्वरचिठ्ठीने भाजपला उपसभापती पद मिळाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *