तालुका कृषी कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने शेतकºयांची गैरसोय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : येथील तालुका कृषी अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो शेतकºयांना रोज तालुक्यातील कृषि कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून राबवण्यिात येत असलेल्या विविध योजना माहितच होत नसल्याने शेतकºयांचा खोळंबा होत आहे. तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी पुरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतकºयांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र तालुका कृषि कार्यालया अंतर्गत येणाºया ९७ गावातील शेतकरी या योजनापासून वंचित राहत आहेत. तुमसर येथे तालुका कृषी कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. तालुक्यातील शेतकºयांना शेतातील कामे सोडून कृषी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी कृषी कार्यालयात जावे लागते़ तिथे गेल्यानंतर अधिकारी, क्षेत्र भेटीवर गेल्याचे कारण सांगितले जाते़ त्यामुळे शेतकºयांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करुन मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही. तालुका कृषि कार्यालयातील अधिकाºयांना कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असतानाही अधिकारी मात्र इतरत्र सोयीनुसार राहत असून कृषी विभागाने शेतकºयांची चेष्टा चालविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.

तालुका कृषि कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. तालुका कृषि कार्यालयाच्या सर्व कारभार रामभरोसे असून विविध कामासाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी जाणारे मोजकेच लोक अधिकाºयांना हाताशी धरून वारंवार योजनांचा लाभ घेतात. मात्र सामान्य शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचितच आहे. शेतकºयांना तालुका कृषि कार्यालयाकडून काहीच फायदा होत नसल्याने अधिकारी कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात शिवसेनेने जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. अर्चना प्रकाश कडू यांना भंडारा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात भेटून निवेदन सादर केला तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली. जर तालुका कृषि कार्यालयाने कामकाजात सुधारणा नाही केल्यास संबंधित तालुका कृषि कार्यालया विरुद्ध आंदोलन छेडले जाईल अशा इशारा शिवसेनेकडून निवेदन देतेवेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुवनकर, निखील कटारे, अमोल बावणे, घनश्याम पोटभरे, महेंद्रसिंग रावते, राजू ठाकूर, स्वप्निल बडवाईक, आदित्य गभने, दीपक मलेवार, रितेश शेंडे, योगेश चिंधालोरे, सतीश वाकरकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *