महाशिवरात्री पर्वावर होणार लाखो भाविकांची गर्दी.. लाखांदूर चुलबंद नदी तीरावर महाशिवरात्रीची जय्यत तयारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी  लाखांदूर : भंडारा जिल्हयातील लाखांदूर या केली. तसेच मागील वर्षी या ठिकाणी ११० फूट हनुमान ावरील शिवतिर्थावर या चारही जिल्ह्यातील लाखो तालुक्याच्या ठिकाणी, भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेशभाऊ डोंगरे आणि त्यांचे परीवार हे मागील २० वर्षांपासून सतत, अविरत महाशिवरात्री निमित्ताने भगवान शंकर देवस्थान मंदिर, लाखांदूर चुलबंद नदीतीरावर यात्रेचे आयोजन करीत असतात. तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त शिवशंकराच्या दर्शनाला येतात, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा, १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखांदूर चुलबंद नदीतीरावर यात्रा होणार आहे. रमेश डोंगरे व कुटुंबियांनी सन २००२ साली भगवान शंकर देवस्थान मंदिर, लाखांदूर चुलबंद नदीतीरावर शिवमुर्तीची प्रतीष्ठापना केली. अनेक हालअपेष्ठा सहन करतांना या शिवतिर्थाच्या निर्माणावेळी काही समाजकंटकांनी विरोधही केला माञ डोंगरे कुटुंबिय न मूर्तीचे भूमिपूजन करण्यात आले. काम प्रगती पथावर आहे. अविरत कष्ट सहणाºया एका सामान्य मानसाकरवी झालेल्या या असामान्य कर्माला जनु या भागातील जनताच वाहुन गेल्याचे चिञ दिसत आहेत. आज हे शिवतिर्थ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. तसेच तालुक्यात पर्यटन स्थळ निर्माण व्हावे व येणाºया भाविकांना निवासी सोयी सुविधा ऊपलब्ध होण्याहेतु चुलबंद तिरालगतच सदनिका बांधल्या गेल्या आहेत. लाखो शिवभक्तांची श्रद्धास्थान असलेले व मागील २० वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या, या देवस्थानात लाखो लोकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने, भाविक भक्त मोठया संख्येने या पवित्र देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्ताने येत असतात. लाखांदुर तालुका हा भंडारा जिल्ह्यातील शेवटचा तालुका असुन याला लागुनच गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्याच्या शिवभक्त येत असतात. हे शिवतिर्थ लाखांदुर – पवनी मार्गावर रस्त्यालगतच आहे. या शिवतिर्थावर वर्षभर शिवभक्तांची रेलचेल असुन महाशिवराञीला या ठिकाणी जञेचे स्वरुप बघावयास मिळते. तसेच दर वर्षी प्रसिध्द व्यक्ती यात्रेचे आकर्षण असतात, चुलबंद नदीतिरावरील या पविञ तिर्थक्षेञाला देशाचे तत्कालीन मंञी व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, विद्यमान वि. प.सदस्य प्रा जोगेंद्र कवाडे, तंञसम्राट जगतगुरू चंद्रास्वामी व अभिनेता असरानी, स्व.यादोराव पडोळे, स्व. नामदेवराव दिवठे यांसह अनेक दिग्गजांनी या तिर्थक्षेञाला भेट दिली आहे हे विशेष…! १८ फेब्रुवारी रोजी महाशिवराञी याञेनिमीत्ताने, डाकराम गायकवाड यांचा कव्वालीचा कार्यक्रम दुपारी २ वा आयोजित केला आहे. या याञा समारंभात दरवर्षी वैद्यकिय शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. या महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने या याञेत येऊन १२ वाजता गोपालकालाचा तसेच इतर सोहळ्याचा लाभ घ्यावा व शिवशंकराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशभाऊ डोंगरे व परिवारातर्फे करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *