जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

वार्ताहर/प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त विविधांगी कार्यक्रम तसेच बाईक रॅली काढून छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांचे प्रतिमेचे पुजन तसेच त्यांच राज्याभिषेक करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

 जि.प.व पं.स. कर्मचरी पतसंस्था भंडारा

भंडारा : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सह.संस्था भंडारा येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष संदिप फुंडे, उपाध्यक्ष चंद्रमणी मेश्राम, सचिव रविकिरण भुरे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच संचालक मंडळ मेघराज हेडाऊ, ज्ञानेश्वर दोनोडे, अंशुमन पंधरे, योगराज धांडे, सुधांशु नेवारे, निलेश वरकडे, सोपान शेंदरे, वनिता सार्वे, चंदा झलके/चारमोडे, विजय ठवकर यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमास संस्थेचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद कार्यालय भंडारा

भंडारा : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद भंडारा येथे डॉ. सचिन पानझाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्यप्रशासन विभाग) यांचे प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन व अभिवादन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात मोहन तेलमासरे, प्रशासन अधिकारी (साप्रवि), चंद्रमणी मेश्राम (आरोग्य विभाग), प्रमोद मानकर, शामकला पंचभाई, हर्षल गायधने, नितेश धारगावे व बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

एम.एच.३६ कॅफे भंडारा

भंडारा : अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत, जाणते राजे, श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भंडारा येथील एम.एच.३६ कॅफे येथे उत्सव स्वराज्याचा निमित्ताने शिवजयंती उत्सव व भोजनदान आयोजीत करण्यात आले होते. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व राजेंना अभिषेक करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. तसेच ह्यछत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीह्ण, च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेले होते. शिवजयतीनिमित्त युवकांमधे उत्साह दिसत होता. एम एच ३६ कॅफे तर्फे प्रसंगी भव्यभोजनदान सुद्धा देण्यात आले. आज जे स्वराज्य आपण उपभोगतो ते सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळेच. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे “मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय, खºया अथार्ने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती, सर्वजातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे. शिवजयंती साजरी करण्याबरोबरच महाराजांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्राचे नाव नेहमी जगात नंबर वन ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे मत यावेळी शिवेश कडव यांनी व्यक्त केले. जयंती उत्सव यशस्वीतेसाठी प्रबल कडव, स्वप्नील मंडपे, वरून कसार, आयुष भांडारकर, वेदांत मुळे आदीसह अनेक युवकांनी सहकार्य केले.

बावणे कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा

भंडारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्चय होय, शत्रूला निधड्या छातीने लढण्याचे धैर्य, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेले, प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवून देण्याची निर्णय क्षमता, महिलांचा नेहमीच आदर करत असत, असंख्य लढाया त्यांनी जिंकल्या, युद्ध जिकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता शिवाजी महाराज यांच्या मधे होती. संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनात शिवाजी महाराज आपल्या आई बाबा सोबत येत असत. सर्व महापुरुष यांच्या पुस्तकाचे वाचन कराम्हणून शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करा असे शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इलमे यांनी सांगितले. संत तुकाराम सभागृह बावणे कुणबी समाज सेवा मंडळ,भंडारा येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. पाहुण्यांचे हस्ते दिपप्रवलन, संत तुकाराम महाराज, शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर सर्व मान्यवरांनी प्रकाश घातला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इलमे बावणे कुणबी समाज सेवा मंडळ अध्यक्ष भंडारा, विनोद रामटेके, सचिव प्रभू मने, मंगला डहाके, अंजली बांते, रोशनी पडोळे, किसन शेंडे, सुर्यकांत इलमे, उमेश मोहतुरे, जयश्री बोरकर, बाळकृष्ण सार्वे, हेमंत बांते, महेश कुथे, भाऊराव सार्वे, वामन गोंधुळे, विवेक पडोळे, गजानन कुंभारे, मोरेश्वर तिजारे, सतीश सार्वे, चेतन चेटूले, सुनिल पंचबुद्धे, बावणे कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा येथिल सर्व मुख्य कार्यकारी मंडळ सदस्य, युवा समिती, महिला समिती सदस्य, व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बावणे कुणबी समाज सेवा मंडळ भंडाराचे युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार महेश कुथे यांनी मानले.

अंनिसतर्फे मुस्लिम कार्यकर्त्याचा सत्कार

भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाºयाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात आली. श्री बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथे मअंनिसच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अख्तर बेग मिर्झा यांचा शाल व पुष्प देऊन संदीप साठवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अख्तर वेग मिर्झा यांनी शिवाजी महाराज यांनी सर्वच धर्मातील लोकांना सन्मान दिला, असे सांगितले. याप्रसंगी मअंनिस राज्य मिर्झा यांचा शाल व पुष्प देऊन संदीप साठवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अख्तर वेग मिर्झा यांनी शिवाजी महाराज यांनी सर्वच धर्मातील लोकांना सन्मान दिला, असे सांगितले.

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *