महिलेला शरिरसुखाची मागणी करणाºया आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शेतात काम करीत असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपी विरोधात पीडित महिलेच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंग चा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे . पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार १७ मार्च रोजी ग्राम वडद येथील ४२ वर्षीय दलीत महिला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी तेजराम कळसकर वय ५५ वर्ष रा. वडद याच्या शेतात गवत काढण्याचे काम करीत होती . दरम्यान आरोपी तेजराम याने पीडित महिलेला शरीर सुखाची मागणी केली. तसेच आरोपीने पीडित महिलेशी शारिरीक जवळिक साधून लैंगिक संबंधांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारवरून साकोली पोलिसांनी प्रकरणाची गांभीयार्ने दखल घेऊन आरोपी तेजराम कळसकर वर कलम ३५४ (अ),५०६ भा.द. वी सहकलम ३ (२) ५ (अ) अ.जा.ज. प्र.कायदा अंतर्गत गून्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *