प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून ममता ब्राम्हणकर यांनी साधली आर्थिक प्रगती

ममता पवन ब्राम्हणकर, मु. बोरकन्हार, ता.आमगाव, जि.गोंदिया येथील रहिवासी असून स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्र आमगाव अंतर्गत आभा महिला बचतगट बोरकन्हार च्या सदस्या आहेत. बचत गटाच्या व संयुक्त दायित्व गटाच्या  माध्यमातून बँक कर्ज घेऊन त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. दुध विक्री व्यवसाय अधिक चांगल्याप्रकारे चालू लागला म्हणून त्यांनी लोकसंचालित साधन केंद्र  चे मार्गदर्शन घेऊन हरिओम डेअरी तालुक्याच्या ठिकाणी उघडली. त्यानंतर त्यांना सहयोगीच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली.

आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  ही योजना कृषी विभागामार्फत संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा,इन्क्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, माकेर्टींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरीता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के/ जास्तीत जास्त १० लाख रुपये तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी रुपये अर्थ सहाय्य सदर योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दुधापासून निर्माण होणाºया विविध वस्तू तयार करण्याच्या मशीन विकत घेतल्या (खोवा,पनीर,तूप). आज त्यांच्याकडे ६०० ते ८०० लिटर दुध येतो. दुधापासून त्या वेगवेगळे पदार्थ तयार करुन विक्री करतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्त्रोतउंचावलेला असून त्या आता आत्मनिर्भर झाल्या आहेत.

त्यांच्या हया कामाची दखल जिहाधिकाºयांनी घेतली आहे. आज तिच्या कामाचे कौतुक जिल्ह्यात सगळीकडे केले जात आहे. यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकारीकर्मचाºयांचे फार मोलाचे मार्गदर्शन मिळाले, त्याबद्दल ममता ब्राम्हणकर यांनी कृषी विभागाचे आभार मानले आहे. इतर नागरिकांनीही पारंपारिक व्यवसायाला बगल देत नवनवीन प्रयोग करून विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ढटऋटए ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधावा.
के. के. गजभिये उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *