राज्यस्तरीय वुशू मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आॅल भंडारा जिल्हा वुशू असोसिएशन तर्फे दि. २ एप्रिल ला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे सीनियर गट मुले व मुलींची निवड स्पर्धा घेण्यात आली होती. मुलांच्या निरनिराळ्या वजन गटात विजयी ठरलेल्या खेळाडू मध्ये राहुल शेंडे, तुषार धुर्वे, युगल मुंगले, मयूर वाढई, मयूर नागमोते आणि युगल आकरे यांचा समावेश आहे. सर्व विजयी खेळाडूंची निवड १४ ते १७ एप्रिल २०२३ ला वेरूळ जिल्हा संभाजि नगर येथे होणाºया ‘२१ वी राज्यस्तरीय महिला व पुरुष वुशू स्पर्धा’ करिता करण्यात आली आहे. स्पर्धेला निरीक्षक म्हणुन नागपूर जिल्हा वुशु असोसिएशनचे सचिव दीपक बिसेन उपस्थित होते.पंच म्हणुन सुमित चानोरे आणि निकुंज चटप यांनी कार्य पाहिले. संचालन भंडारा जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव गणेश साकुरे यांनी केले. निवड झालेल्या खेळाडूंचे संजय कुंभलकर कार्यकारी अध्यक्ष, बाबू बागडे अध्यक्ष, विजू सुखदेवे, विनय उजवने, अमर उजवने यांनी अभिनंदन केले. निवड झालेले खेळाडूं महाराष्ट्र राज्य पातळीच्या स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे सचिव गणेश साकुरे यांनी दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.