पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ४ व्यक्तींचा घेतला चावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर शहरात पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने शहरात धुमाकूळ घालून तब्बल ४ व्यक्तींचा चावा घेतला आहे. तसेच शाळकरी मुलांवर सुद्धा चावा घेण्यासाठी पिसाळलेला कुत्रा धावला असता यावेळी लाखांदूर तालुका शहर अध्यक्ष अ‍ॅड. मोहन राऊत यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पळवून लावले. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर यात चार जणांना चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लाखांदूर नगर पंचायतने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी भयभीत झालेल्या नागरिकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात एक पिसाळलेला कुत्रा फिरत आहे. त्या कुत्र्याने २१ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान ४ जणांना चावा घेतला. पिसाळलेला कुत्रा चावा घेत असल्याची माहिती काही वेळात शहरात पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरील नागरिक या कुत्र्याला पाहून सैरावैरा पळताना दिसून आले. विशेष म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्या नागरिकांच्या मागे धावू लागल्याने नागरिकांमध्ये भीती आणखीनच वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *