राज्यात २२ नव जिल्ह पस्तावित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : सोमवार दि. १ मे महाराष्ट्र दिन. आजच्याच दिवशी १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज राज्यभर हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जात असताना आता एक नवीन मागणी पुढे येऊ लागली आहे. राज्यात सध्या असणाºया ३६ जिल्ह्यांचे विभाजन करून ५८ जिल्हे करण्याचा प्रस्ताव समोर येतो आहे.

अनेक गावे विकासापासून दूर : १ मे १९६० रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा २६ जिल्हे अस्तित्वात होते. त्यापैकी अनेक जिल्हेहे लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही मोठे होते. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी जनतेची गैर सोय होऊ लागली. त्यानंतर आतापर्यंत राज्यात १० नव्या जिल्ह्यांची भर पडून राज्यातील एकूजिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. मात्र आजही अनेक गाव खेड्यातून येणाºया नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवास करावा लागतो. प्रगतिशील महाराष्ट्रात आजही अनेक गावे ही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यासाठीच आता राज्यात आणखी २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेचे २६ जिल्हे : ठाणे, कुलाबा (आत्ताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद (आत्ताचे नाव छत्रपती संभाजीनगर), परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चंद्रपूर (पूवीर्चे नाव चांदा) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्यात होते.

१९८१ पासून आत्तापर्यंत १० जिल्ह्यांची भर: या जिल्ह्यातून हे नवे जिल्हे तयार झाले रत्नागिरी – सिंधुदुर्ग (१ मे १९८१), छत्रपती संभाजीनगर – जालना (१ मे १९८१), धाराशिव – लातूर (१६ आॅगस्ट १९८२), चंद्रपूर गडचिरोली (२६ आॅगस्ट १९८२), बृहन्मुंबई मुंबई उपनगर (१ आॅक्टोबर १९९०), अकोला वाशिम (१ जुलै १९९८), धुळे – नंदुरबार (१ जुलै १९९८), परभणी – हिंगोली (१ मे १९९९), भंडारा – गोंदिया (१ मे १९९९), ठाणे – पालघर (१ आॅगस्ट २०१४).

१ मे १९६० रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा राज्यात २६ जिल्हे अस्तित्वात होते. त्यानंतर प्रशासकीय सुविधेसाठी त्यात आतापर्यंत १० नव्या जिल्ह्यांची भर पडून राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. आता राज्यात आणखी २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *