राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाºयासह पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : पुढील तीन दिवस पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान विभागाअंतर्गत सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आॅरेंज अलर्ट जारी केला आहे. भंडारा, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम/ तीव्र गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (४० -५०0 किमी ताशी) येण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, भंडारा, वर्धा, अमरावती, वाशीम, अकोला, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच गोंदिया आणि चंद्रपूरात काही ठिकाणी गारपिटी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह तब्बल दहा राज्यांमध्ये हवामान खात्याने आॅरेंज अलर्ट जारी केला असून, जोरदार वाºयासह गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तरप्रदेश, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, किनारी आंध्रप्रदेश, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूच्या दूरच्या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *