बुद्ध जयंती जयंती (पोर्णिमा) मिलिंद बुद्ध विहार समितीचे नाविन्य पूर्ण उपक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोबर १९५६ ला नागपूर च्या पवित्र दीक्षाभूमीवर तथागतांच्या मानवतावादी बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची घोषणा केली. परंतु धम्मदीक्षेनतंर बाबासाहेब आपल्यातून लवकरच निघून गेल्यामुळें संपूर्ण भारत बौद्धमय करीन या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्न पुर्ततेची जबाबदारी आपणा सर्वांच्या खांद्यावरती येवून पडली. म्हणुनच तथागतांच्या मानवतावादी बुद्ध धम्माचा रथ निश्चित दिशेने गतिमान राहण्यासाठी आणि बुद्ध धम्माच्या विचार चिंतनामधुन समाजाला नवीन दिशा देवुन धम्म चळवळीला सृजनशील उर्जा प्राप्त व्हावी हाच शुद्ध हेतू मनाशी बाळगून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक ५ मे २०२३ रोज शुक्रवार ला मिलिंद बुद्ध विहार, जवाहर(कोंढी)येथे बुद्ध जयंती (पोर्णिमा) आयोजित करण्यात आली.

बुद्ध जयंती समारोहाचे मुख्य अतिथी जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पि.बोरकुटे हे होते. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील फुलझरी गावात बौद्ध समाजाचे एकही घर नसतांना या गावातील परिवर्तनवादी समाजातील लोकांनी सामूहिकरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती समारोहाचे आयोजन यशस्वीरित्या घडवून आणले.त्यांच्या या सामाजिक विशेष उपक्रमाची दखल घेवून त्यांचा मिलींद बुद्ध विहार समिती जवाहर(कोंढी) द्वारा सत्कार व सन्मान सोहळा.

आयोजित करुन राजेंद्र उईके ,पुडंलीक ढोले,सौरभ भंडारे,आशिष शेंडे, अंकुश कस्तुरे, पुरुषोत्तम शेडमाके व राहुल मरापे इत्यादी ग्रामसभेच्या पदाधिकारी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.बुद्ध जयंती (पोर्णिमा)समारोहाचे संचालन माधव जिवने,प्रास्ताविक राहुल रामटेके,विशेष मार्गदर्शन अन्ना मोटघरे तर आभार सुनील सुखदेवे यांनी केले. बुद्ध जयंती समारोहात जवाहर नगर परिसरातील धम्म बंधू व भगिनी व अनेक पत्रकार उपस्थित होते.बुद्ध जयंती समारोह यशस्वी घडवून आणण्यासाठी बुद्ध विहार समिती जवाहर (कोंढी) च्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. खिरदानाने समारोहाची सांगता झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *