चांदणी चौक येथील बोअरवेलला सौर ऊर्जेद्वारा मोटारपंप बसवा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील संत कबीर वार्ड, चांदणी चौक येथील सागर तलाव मच्ची सोसायटी समोरील बोअरवेलला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन मोटारपंप लावून तसेच एक पाण्याची टाकी बनवून सदर मोटारपंप ही पाण्याचा टाकीला बसवून वार्डातील नागरिकांना पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी युवा शक्ती संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष गोवर्धन निनावे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदनातून केली आहे. भंडारा शहरातील संत कबीर वार्ड, चांदणी चौक, सागर तलाव या परिसरात दाट वस्तीअसल्यामुळे लोकसंख्या जास्त आहे. पण लोकसंख्या पाहता वार्डामध्ये पाण्याची व्यवस्या कमी आहे. वार्डात तलाव व एक बोरवेल हेच दोन पाण्याचे साधन आहेत. तलावातील पाणी हा कोणत्याच उपयोगाचा नसुन एक बोरवेल सर्व परिसरात पाणी पुरविण्यासाठी अपुरी पडत आहे.

त्या बोरवेलला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन मोटारपंप लावून तिथे एक पाण्याची टाकी बनवून दिली तर वार्डातील पाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच येथील नागरिकांना हे पाणी उपयोगी पडून मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकते, या विषयावर मुख्याधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली वमुख्याधिकाºयांनी या कामाला लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन युवा शक्ती संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष गोवर्धन निनावे यांना दिले. निवेदन देतेवेळी युवा शक्ती संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, कुणाल बोकडे, गौरव पारवे, सुर्यांश भंडारी, भुषण देशमुख, सौरभ तांडेकर, क्रुणाल तांडेकर, योगेश कोहाड, प्रद्युम्न्य निनावे, गौरव चोपकर, शुभम सोनवाने, विक्की सोनवाने, सागर असाटी, अनमोल पारवे, बबलू खंडाईत, रवी खेडकर, आदित्य चौधरी, आकाश सोनवाने आदी युवा शक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.