प्रतीक्षा संपली येत्या शुक्रवारी बघा “दिल बेधुंद”

प्रतिनिधी नागपूर : आगामी “दिल बेधुंद” या चित्रपटाचे कथा लेखन गुड्डू देवांगन यांनी केले असून, हा चित्रपट शुक्रवार,१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती संगीतकार स्वप्निल शिवणकर आणि कलाकारांनी पत्रपरिषदेत दिली. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे.? चित्रपटाचे निर्माते शिवमपाटील असून दिग्दर्शन संतोष फुंडे यांचे आहे. या चित्रपटात जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धिरज तरुणे, गोविंद चौरसिया, संतोष सारवा आणि चिरंजीव सिंग यांच्या भूमिका आहेत. प्रेमकथा म्हटली की साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचे एक कथानक, नायक, नायिका, भावना उंचबळून आणणारेसंगीत आणि अत्यंत प्रेमळ वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो.

मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात जातात. अरे हे तर आधीच माहीत होतं, असं म्हणतात आणि परत येतात. प्रेम कथेवर आधारित तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपटही त्याला काही अंशी करणीभूत असतात, पण अर्थात सगळे चित्रपट असे एकाच मुशीतून काढलेले नसतात, बरं का! अशीच एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी “दिल बेधुंद” सज्ज झाला आहे. पत्रपरिषदेत आरती कुथे, संयोनी मिश्रा, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, चिरंजीव सिंग, स्वप्निल शिवणकर (संगीतकार), डॉ. नील इंगळे (नायक), स्वप्निल भोंगाडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *