‘त्या’ उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मौजा चीचाळ येथील शासकीय भूखंड विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मौजा चीचाळ येथील राजन वासनिक, विजय तक्रारी दिल्या परंतू चौकशी चे आदेश देण्यात आल्यावर सुद्धा चौकशी करण्यात आली नाही. ग्रामसभेत बाहेरील गावच्यांना जागा विक्री करणाºयाचा फेरफार करायचा नाही असा ठराव घेतल्यानंतरही विक्री करणाºयाचा गोरख धंदा जोमात सुरू असल्यामुळे व वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करीत नसल्यामुळे तसेच भविष्यात गावातील मुलांना खेळण्यास मैदान शिल्लक राहणार नसल्यामुळे नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला जेणकरून वासनिक, मालता बालकृष्ण सोनवाने हे दिनांक ०८ मे २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ-दहा दिवसांपासून उपोषण करीत असून शासकीय जमीन विक्रीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणाºया उपोषण कर्त्यांकडे जिल्हाधिकारी यांनी जानीवपूर्वक फिरविली पाठ आहे.

मौजा चीचाळ येथे मागील सात आठ वर्षापासून शासकीय जागा विक्री चा व्यवसाय ग्राम पंचायत समितीच्या आशीवार्दाने जोमात सुरू असून या विरोधात चीचाळ नागरिकांनी अनेकवेळा अधिकाºयांना लेखी व तोंडी अधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष देऊन चीचाळ येथील शासकीय जागा विक्री प्रकरण बंद करून दोषींवर कार्यवाही करावी. त्याच प्रमाणे यात हात ओले करणाºया व कार्यवाही करण्यात टाळाटाळ करणाºयां अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मौजा चीचाळ येथील नागरिकांचे उपोषण सुरू आहे. तरी शासकीय जागा विक्री प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यवाही करणार की शासकीय जागा विक्री करणाºयांना मोकाट सोडण्यात येईल या कडे संपूर्ण लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *