‘महाप्रित’चा कर्करोगाच्या उपचारासाठी समीर संस्थेसोबत सामंजस्य करार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत महाप्रित (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व समीर (Society for Applied Microwave Electronics Engineering ) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगावर उपचार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. समीर संस्थेचे श्रीमती सुनिता वर्मा तसेच महाप्रित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.                              यावेळी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या लक्षात घेता कर्करोगासारख्या असाध्य रोगावर रेडिओथेरपी व रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे या रोगावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या होईल’. याप्रसंगी बोलताना श्रीमती सुनिता वर्मा म्हणाल्या, ‘या करारामुळे समीर (SAMEER) संस्थेमार्फत रेडिओलॉजी व रेडिओथेरपी संशोधन व तंत्रज्ञानाची कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मदत होईल. महाप्रिततर्फे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यात येईल.

या संशोधनामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होतील व त्यामुळे भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी मदत होईल’. याप्रसंगी समीर (SAMEER) संस्थेचे या सामंजस्य कराराच्या वेळी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.) व प्रमाणात सुविधा निर्माण होऊन उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्याव्दारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात रोजगारनिर्मिती अधिकारी, महाप्रित तसेच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबईचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *