भंडारा अंनिसने केला ढोंगी बाबाचा भंडाफोड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दैवी चमत्काराचा दावा करणारा चिरेखणी येथील ढोंगी बाबाचा भंडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराव्दारे करण्यात आला. या भंडाफोड मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे बुवाबाजी संघर्ष समितीचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी केले. तिरोडा पोलीस स्टेशन येथे या ढोंगी बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया चिरेखणी येथील संजय साठवणे हा स्वत:च्या अंगात फरीदबाबा आल्याचे भासवून रोगमुक्त करण्यासाठी तंत्र-मंत्र करून राख लिंबू देत होता. कुणाला भूतबाधा, करणी केली आहे हे सांगून भांडणे लावायचा. कोणाला मूलबाळ होत नसतील त्याला मूल होण्याची विधी सांगत होता.

समाजात, गावात अंधश्रद्धा पसरवित असल्याची व त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महाराष्ट्र हमखास बरा होशील, नाही तर तुझे वाईट होणार अशी धमकी दिली. तंत्र मंत्र करून राख दिली. घराभोवती मोहºया व मीठ टाकण्यास सांगितले. दिनांक २५ मे ला दरबारात येण्यास सांगितले. या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, प्रकाश नाकतोडे, चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने यांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. चिरेखणी येथील ढोंगी बाबाच्या दरबारात पोलिसां समक्ष भेट दिली तेव्हा दरबारात वीस ते पंचवीस खेड्यापाड्यातील महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी दशरथ शहारे यांनी बाबाला सांगितले की, माज्या पोटात व छातीत दुखते, चक्कर येतो. तेव्हा बाबाने तंत्र-मंत्र करुन दोन लिंबू दिले. बाबा जोराजोरात ओरडू लागला व मला घर बांधावे लागेल तेव्हाच तुज्या घरची कुसराई तुला सतावणार नाही, असे सांगितले.

त्याचवेळी विष्णुदास लोणारे यांनी बाबाला विचारले की, बाबा माझे नाव काय आणि मी कोण आहे आणि कुठून आलो आहे. बाबांनी उत्तर न देताच माज्या अंगात काहीच येत नाही असे म्हटले व बाबाच्या अंगातला फरिद बाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव घेताच गायब झाला. यानंतर लोकांची फसवून करणार नाही, भांडण लावणार नाही असे सांगितले. या प्रकरणी तिरोडाचे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, पोलीस हवालदार नितेश बावणे, चेतन भैसारे, निलेश ठाकरे, महिला पोलीस भूमेश्वरी वराडे यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर माणूस अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायदा २०१३ चे कलम ३, २ नुसार ढोंगी बाबा संजय साठवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली. पुढील तपास सुरु आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे प्राप्त झाली.

त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता दशरथ शहारे, नितेश बोरकर यांना बाबाच्या दरबारात पाठविण्यात आले. फरिद बाबाने दशरथ शहारे यांना सांगितले की, तुज्या घरी खुप जुनी देवता आहे, ती तुला सतावते, तिला बांधण्यासाठी तुला पुन्हा इथे यावे लागेल. ही राख खा तू

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *