लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र ?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपा आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा या दोन्ही निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असा आदेश प्रशासनाला दिला. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्यनिवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना एक आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी तथा कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश जारी केले आहेत. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाºयांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेची मुदत आॅक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील विधानसभा विसर्जित करून निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम आयोगाच्या अधिकाºयांनी सुरू केले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.