समाजसेवी तरुणांच्या कर्तुत्वाला सलाम

 

प्रतिनिधी नागपूर : रात्री आठ वाजता राणा प्रताप नगर चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंद होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. वीस मिनिटे होऊनही एकही जागची गाडी हलेना. अशावेळी तीन तरुण अज्ञात तरूण ट्रॅफिक मधून धावत चौकात आले. एखाद्या कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिसप्रमाणे संपूर्ण ट्रॅफिक कंट्रोल केला. अवघ्या पंधरा मिनिटात चौकातील सगळे रस्ते मोकळे झाले. इतकंच नाही तर त्यानंतर अर्धा तास एका बाजूला थांबून ट्रॅफिक कन्ट्रोल करत होते. त्यांना असे करण्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, रस्ता जाम झाल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते, ती टाळण्यासाठी आम्ही येथे थांबलो आहे, असे ते म्हणाले. अनंता, नितेश गुरव, सारंग कदम, अशी त्यांची नावे होती. अशा प्रकारची सेवा करणारे लोक क्वचितच आढळतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.