अत्याचार प्रकरणातील ‘त्या’ आरोपींना फाशीची शिक्षा द्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : कालीमाटी येथील एका गतिमंद मनोरूग्ण युवतीवर दोन नराधमांनी अत्याचार केला. या संदर्भात गोरेगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुशिल राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात गोरेगावचे ठाणेदार भुसारी यांची भेट घेवून या तिच्या कुटूंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. पीडित युवती आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती. तिची बहिणी व घरातील इतर लोक विट भट्ट्यावर कामाला जायचे. अशात पिडीत युवती ही घरी एकटीच राहत असे. नराधमांनी याच संधीचा लाभ घेत पिडीत युवतीवर अत्याचार केला. ही बाब शेजारच्या लक्षात येताच घटना उजेडात आली. पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.

दरम्यान, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊतयांनी समाजबाधवांसह पीडित कुटूंबाची भेट घेवून सात्वंन केले. तसेच गोरेगावचे पोलिस निरीक्षक भुसारी यांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावची, पीडित युवतीला शासनाने ५ लाख रुपये मदत देण्याची मागणी केली. यावेळी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत, गोरेगाव तालुकाध्यक्ष विजय नेवारे, रिपाई (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊ गजभिये, वैैलाश राऊत, सुखराम कवरे, खेमराज साखरे, नंदलाल सोनवाने, रवि राऊत, वामन वाघाडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *