कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट; धानाच्या बियाणांची चढ्या दराने विक्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : मृग नक्षत्र कोरडा गेला, आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी तब्बल २० दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता आपल्या हंगामाकडे वळला असून त्यात या चढ्या दराच्या बिजायती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील केसलवाडा /वाघ, गडेगाव, लाखोरी, सालेभाटा, मानेगाव, कनेरी येथील कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असून किमतीपेक्षा अधिक दराने व मनमर्जी दराने धान बीजायत विक्री केल्या जात आहे. शेतकरी ही नाईलाजास्तव हे बिजायात खरेदी करीत आहेत. राज्याचे कृषिमंत्री अब्दुलसत्तार यांनी बोगस बियाणे व चढ्या भावाने विक्री प्रकरणी अकोला जिल्ह्यात धाडी टाकून शेतकºयांना दिलासा दिला असला तरीही भंडारा जिल्ह्यात मात्र अधिकारी मुंग गिळून बसले असल्याने शेतकºयांना कमालीचा मनस्ताप सहनकरावा लागत आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यात १०० % धान पिकाची लागवड केली जाते. लाखनी परिसरातील कृषी केंद्र चालक मनमर्जी चढ्या दराने धान बिजायती ची विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतक?्यांची आर्थिक लुट मोठ्या प्रमाणात होत असून परिसरातील केसलवाडा /वाघ, गडेगाव, लाखोरी, सालेभाटा, मानेगाव, कनेरी येथील कृषी केंद्र चालक मनमर्जी दराने विक्री करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. याकडे मात्र कृषी विभाग लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे कृषी केंद्र चालकांना कृषी अधिकारीच पाठबळ देत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

बोगस बियाणे असण्याची शक्यता

सध्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागला असून परिसरातील कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणे विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे कृषी विभाग कृषी केंद्र चालकांवर कारवाही करण्यापेक्षा त्यांना पाठबळ देत असल्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *