पीएममित्रा,अमरावती टक्सटाइल पाकसाठी राज्याचा कद शासनाशी सामजस्य करार

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पीएम मित्रा पार्कचा शुभारंभ सोहळा दि. १६ जुलै,२0२३ रोजी ग्रँडहयात, मुंबई येथे आयोजित करण्यात आला. यासोहळ्यात महाराष्ट्र सरकार आणि वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यासह एकूण रु. १३२० कोटींच्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यात सनाथन पॉलीकॉट प्रा. लि. रु. १००० कोटी, प्रतापइंडस्ट्रीज लि. रु. २०० कोटी, श्रीसिद्धिविनायककॉटस्पीन प्रा.लि रु. १०० कोटी आणि पोलमन इंडिया लि. यांच्या रु. २० कोटीच्या करारांचा समावेश आहे.त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ५००० इतका रोजगार उपलब्ध होणारआहे. या कार्यक्रमाला भारत सरकारच ेवस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री, भारत सरकार, श्रीमती दर्शना जरदोश, उद्योगमंत्री उदय सामंत आणि वस्त्रोद्योग मंत्री, चंद्रकांत पाटील, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक रूप देण्यासाठीआणि मा. पंतप्रधानांचे ध्येय असलेले पाच एफ (फार्मटूफायबरटूफॅक्टरीटूफॅशनटूफॉरेन) साध्य करण्यासाठी भारत सरकारने ेपीएममित्रा पार्कची घोषणा दि. १५जानेवारी २०२२ रोजी केली होती. भारत सरकारच्यासहकार्याने ही उद्याने उभारण्यासाठी अनेक राज्यांनी आपल ेप्रस्ताव सादर केले होते. मार्च २०२३ मध्ये, सात पीएममित्रा पार्क स्थापनेसाठी केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे. भारत सरकारने महाराष्ट्रासाठी अमरावती जिल्ह्यात ब्राऊनफिल्ड पीएममित्रा टेक्सटाईल पार्क मंजूर केले आहे. कापूस लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यामधील दोनशेहून अधिक प्रस्थापित उद्योगांमुळे आधीच एक सुविकसित वस्त्रोद्योग परिसंस्था आणि उच्च कुशल कामगार उपलब्ध आहे. नांदगावपेठ येथे अतिरिक्त १०२० एकर जागेवर विशाल वस्त्रोद्योग उद्यान उभारल ेजात आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गापासून अमरावती येथील एमआयडी सीचे औद्योगिक क्षेत्र ३० किमी अंतरावरआहे, तर सर्वात जवळचे वर्धा ड्रायपोर्ट १४७ किमी अंतरावर आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *