दुकान फोडणाºया गुन्हेगाराला ५ वर्षाचा कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दुकानात फोडून मुद्देमाल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुळकर्णी यांनी ७ आॅगस्ट रोजी ५ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड ठोठावला. खन्ना राजकुमार कुमार (२७) रा.दसखोली असे गुन्हेगाराचे नाव आहे. शहरातील सिंधी कॉलनीतील नरेश भक्तांनी यांच्या गंज बाजारातील दुकानाचे शटर तोडून दोन आरोपींनी ३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी खन्ना राजकुमार कुमार रा. दसखोली गोंदिया व योगेश गोविंदराव उगेमुगे (३०), रा. मरघट रोड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यातील योगेश उगेमुगे याला अटक झाली असून खन्ना राजकुमार कुमार हा घटनेनंतर फरार होता. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केल्यावर सबळ साक्षपुरावे गोळा करून दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय दाखल केले होते. खटल्याचे सुनावणीत खन्ना राजकुमार कुमार याच्यावर दोषसिध्द झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी ५ वषार्चा सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिलींद नवगिरे यांनी केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *