एका नायब तहसीलदाराचे खांद्यावर चौघांचा भार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : येथील तहसील कार्यालयात मंजूर चार नायब तहसीलदार पदे असली तरी येथे दोन पदे रिक्त असून एक नायब तहसीलदार मागील दोन वर्षापासून गोंदिया येथे कार्यरत असल्याने तिरोडा तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदाराची धुरा एकच नायब तहसीलदार वाहत असल्याने येथे राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेकडे ही दुर्लक्ष केल्या जात असल्याचा प्रकार दिसत आहे यामुळे येथील नायब तहसीलदारांची रिक्त पदे जिल्हाधिकाºयांनी भरून येथे जनतेला होत असलेला त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे.

तिरोडा तहसील कार्यालयात संजय गांधी, निवासी, निवडणूक व नियमित नायब तहसीलदाराची चार पदे मंजूर असली तरी सध्या येथे निवडणूक विभागात एक मात्र नायब तहसीलदार कार्यरत असून संजय गांधी विभागात नियुक्त असलेले नायब तहसीलदारांची मागील दोन वषार्पासून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्रती नियुक्ती करण्यात आल्याने येथे निवासी नायब तहसीलदार, नियमित नायब तहसीलदार व संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार नसल्यामुळे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदारा कडेच सर्व विभागांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेप्रमाणे निवडणूक विभागाचे कामे महत्त्वाची असल्याने वेळेवर होणे गरजेचे असल्यामूळे या विभागातील अधिकारी व कर्मचाºयाकडे इतर कुठल्याही विभागाचे कार्य सोपवू नये असे निर्देश असताना देखील तिरोडा निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार यांच्याकडे निवडणूक विभागासह इतर तीनही नायब तहसीलदाराचा कार्यभार असल्यामुळे निवडणूक संबंधी अनेक कामे रेंगाळत असून या कार्यालयात आपले कामासाठी येणारे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनाही आपले कामासाठी वारंवार फेºया माराव्या लागत असून अनेकदा कार्यालयीन मिटिंग व इतर कामाकरता येथील नियुक्त नायब तहसीलदार व तहसीलदारही दौºयावर असल्यास या तहसील कार्यालयातील कामे ठप्प होत असली तरी या गंभीर बाबीकडे कूणाही जनप्रतिनिधीने आवाज उठवला नाही. यामुळे येथील कर्मचारी व नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत असून याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी लक्ष देऊन रिक्त असलेले नायब तहसीलदाराची पदे भरून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *