बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रफुल्ल पटेल यांच्यात राजकीय चर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका होत असून त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि.५) मध्यप्रदेशातील शिवणी येथे प्रचार सभेसाठी जाण्याकरिता आले होते. तेथे जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पंधरा ते वीस मिनिटे राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खा. सुनील मेंढे, आ विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, माजी आ. राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

यावेळी पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात चर्चा झाली. जवळपास२० मिनिटे झालेल्या चर्चेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियाभंडारा जिल्ह्यातील विकास कामे, बिरसी विमानतळावरुन १ डिसेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा प्रारंभ होत आहे. तसेच भविष्यात या विमानतळावरुन कार्गो सेवा सुरु झाल्यास तांदूळ व अन्य कृषी मालाची निर्णयात करण्यास मदत होईल. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आदी विषयावर चर्चा झाली. राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटांच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात काही चर्चा झाल्याचे बोलल्या जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *