लाख उत्पादकांना कौशल्य प्रशिक्षण दयावे – पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी काल सायंकाळी जिल्हयातील जमनी रेशीम केंद्र, दाभा व लाखनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील लाख क्लस्टरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा अंतर्गत मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथील रेशीम प्रशिक्षण केंद्र, टसर रेशीम अंडीपूंज निर्मिीत केंद्र, टसर रेशीम रिलींग केंद्र, तुती व टसर खादय वृक्षाचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व प्रदर्शनीची पाहणी श्री. गावित यांनी केली. रेशीम विकासासाठी भविष्यात आणखी काय नाविन्यपुर्ण व तंत्रज्ञानाची जोड देवून रिलींग व रेशीम उत्पादन कसे वाढवता येईल याबाबत त्यांनी जमनी येथील रीलिंग केंद्रात कार्य करणाºया महिलांशी संवाद साधला व त्यांच्या कामातील अडचणीही जाणून घेतल्या.

रेशीम विकास अधिकारी एम.आर. डीगुळे तथा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे. बी. सरादे यांनी पालकमंत्र्यांना विस्तृत माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय रेशीम मंडळाचे बुनियादी बीज प्रगुणन व प्रशिक्षण केंद्र, दवडीपार येथेही श्री.गावीत यांनी भेट दिली. त्यानंतर लाखनी तालुक्यातील भंडारा फॉरेस्ट लाख क्लस्टरची पाहणी केली. क्लस्टर विषयी माहिती कार्यकारी संस्था त्रिनेत्र पदुम कृषि व ग्रामीण बहु. शिक्षण संस्थेचे श अध्यक्ष महेश्वर शिरभाते यांनी दिली. क्लस्टरच्या विकासाकरीता शक्य तेवढी मदत करण्याचे श्री.गावित यांनी आश्वस्त केले. यावेळी उदयोग केंद्राचे व्यवस्थापक हेमंत बदर व लाख उत्पादक शेतकरी कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. लाखेचे उत्पादन वाढविण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सूचना केल्या. सामुदायिक जंगल व्याप्त प्रदेशात तसेच शेतकºयांच्या शेतावर करार पद्धतीने लाख शेती करून एकरी ५ लाखापर्यंत शेतकºयांना उत्पन्न घेता येऊ शकते. संबधित लाख उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी व कारागिरांना प्रशिक्षण पुरवण्याची जबाबदारी कौशल्य विकास विभाग यांनी करावी तसेच लाख उत्पादन वाढीसाठी आराखडा तयार करण्याचे काम महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र यांनी करावे,असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *