श्री नरेंद्र महाराजांच्या पादुका दर्शनात सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतो- डॉ. फुके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे जगतगुरु श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुका दर्शनाच्या भव्य कार्यक्रमात सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. श्री नरेंद्र महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत डॉ. परिणय फुके यांनी कार्यक्रमाप्रसंगी भाविकांना संबोधित केले. समाजातील गरीब, गरजूंना येथील ट्रस्टच्या वतीने आटा चक्की आणि फवारणी यंत्र देण्यात आले. अडी-अडचणीत सापडलेल्या असंख्य लोकांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी नेहमीच ट्रस्टमार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात, याचा आवर्जून उल्लेख करावा असे मला वाटते, असेही डॉ फुके म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी राजेन्द्र भोयर,प्रवीण परब, अनिल उरकुडे, श्रावण राऊत, माजी खासदार मधुकर कुकडे, अजय शेंडे, सौ. शिल्पा आस्वले, अमोल हलमारे, देवेंद्र दलाल, रविभाऊ परशूरामकर, मनीष कापगते, नितीन खेडीकर, मदन रामटेके, चंद्रकांत वडीचार, विनोद ठाकरे, सदुभाऊ कापगते, सौ धनवंताताई राऊत, संतोष भुरे, प्रशांत पुंजेकर, होमराज वणवे, मुन्नालाल मोटघटे, मिनाताई लांजेवार, संदीप भांडारकर, नरेंद्र वाडिभस्मे तसेच असंख्य भाविकांची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *