वर्षभरात ६२ हजारावर ग्राहकांची घरे उजळली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांना त्वरीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े सुरु करण्यात आलेल्या मोहीमे अंतर्गत १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षभरात नागपूर परिमंडलातील तब्बल ६२ हजार २४३ ग्राहकांच्या घरात वीज देत महावितरणने त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज आॅफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील ३६ हजार ३४२, नागपूर ग्रामिण मंडलातील १६ हजार ९५४ आणि वर्धा मंडलातील ८ हजार ७४७ घरगुती ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत.

यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९८१ वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल महाल विभागात ७ हजार ८९५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय सिव्हील लाईन्स विभागात ७ हजार ९१, बुटीबोरी विभागात ६ हजार, गांधीबाग विभागात ५ हजार ६३९, मौदा विभागात ८ हजार ५८, सावनेर विभागात ३ हजार ९८६, उमरेड विभागात २ हजार ६४६, काटोल विभागात २ हजार २६४ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागात ४ हजार ३०३, आर्वी विभागात २ हजार २८५ तरहिंगणघाट विभागात २ हजार १५९ घरगुती ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *