रामरथ यात्रेचे मोहाडी येथे जल्लोषात स्वागत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी रामरथ यात्रा काढली असून मोहाडी तालुक्यातील पालोरा, वरठी, नेरी, जाब, डोंगरगाव, मोहाडी येथे काढण्यात आली. मोहाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक बिरदरीचे विक्रम फडके, वैभव कोलते, अश्विनी शंभरकर, बबली येळणे, खुशी पैगवार, पलक, पैगवार, प्रिया कोलते पैगवार, प्रणित उके यांनी अयोध्येत होणाºया २२ जानेवारीला होणाºया कार्यक्रमाचे महत्त्व पथनाट्यातून दिले. कदाचित पहिल्यांदाच एखाद्या आयोजनाबद्दल जनसामान्यांची इतकी उत्कंठा शिगेला पोहोचली असेल. प्रभू श्रीरामाच्या आगमनाची लागलेली उत्कंठा मोहाडी तालुक्यातील गावागावात दिसून येत आहे. गावे सजली आहेत, रात्रीच्या अंधारातही नागरिक रामदर्शनासाठी गर्दी करीत आहेत. तर शाळकरी मुले शक्य त्या पद्धतीने रामाप्रती आस्था प्रगट करण्याचा प्रयत्न करीत आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात मोहाडी तालुक्याच्या यात्रा भ्रमणचेवेळी प्रदीप पडोळे, भगवान चांदेवार, निशिकांत इलमे, बाबू ठवकर, कुणाल मोहतूरे, राजेंद्र शेंडे, दिगंबर सेलोकर, जगदीश गोबाडे, यादोराव मुंगमोडे, महेंद्र गभने, पवन बडवाईक (सातोना), नितेश सेलोकर, रवि लांजेवार हजर होते. उमेदीचा काळ असताना, कशाचीही तमा न बाळगता अनेकांचे नेतृत्व करीत कारसेवक आणि विद्यमान खासदार सुनिल मेंढे दोन्ही कारसेवांच्या वेळी अयोध्येत पोहोचले होते.

आपले सर्वतोपरी योगदान या कारसेवेत देत त्यांनी प्रभू रामललांसाठी तात्पुरते मंदिर उभारण्यात मोलाचा वाटा उचलला होता. खासदारांमधील हा कार सेवक पुन्हा रामसेवेसाठी निघाला. सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी होणाºया अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथयात्रा काढली. सहा तालुक्यांचा प्रवास करून ही रथयात्रा मोहाडी तालुक्यात पोहोचली. मोहाडी शहरात पीआरओ कार्यालयसमोरून तिरुपती मित्र परिवाराचे अध्यक्ष आतिष बारई, आदर्श बडवाईक, तेजस मोहतुरे, रवि थोटे, शंकर विठ्ठल बारई, अजय कडव, अमित पाटील, शैलेष कावळे,राहुल मेहर, कार्तिक गभने, नितेश सेलोकर, पवन गायधने, नरेंद्र निमकर, गणेश निपाने, प्रमोद खराबे, सचिन गायधने, यशवंत थोटे, गिरीधर मोटघरे, विजय बारई, जयेंद्र मेहर, अनिल न्यायखोर आदीं रथ यात्रेमध्ये सहभागी झाले. रथयात्रेच्या पहिल्या दिवशीपासून मिळणारा प्रतिसाद कायम वाढतच गेला. मातृशक्ती असो, पुरुष किंवा लहान मुले, प्रत्येकाने दाखविलेला रामा प्रतीचा निष्ठाभाव यात्रेच्या सफलतेसाठी कारणीभूत ठरला.

रामरथाचे गावागावात पूजन करण्यात आले. रथयात्रेचे मोहाडी शहरात आगमन होताच मोहाडीचे नगराध्यक्ष छाया डेकाटे, नगरसेवक दिशा दिनेश निमकर, सविता विलास साठवणे, रेखा मनोहर हेडाऊ, वंदना कृष्णा पराते, वीणा बंडू मारबते, गौरी राऊत, रविकांत देशमुख, निलेश माहुरकर, मंगेश पारधी, नरेंद्र निमकर, फिरोज कुंभारे, सुशील साखरवाडे, हेमंत मोटघरे, यश बागडे, यांच्या उपस्थितीत फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. श्री राम रथावरील फुलांचा झालेला वर्षाव लोकांमधील भक्ती भावाचे प्रगटीकरण करणारा होता. जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. प्रमुख ठिकाणी खासदारांकडून उपस्थित प्रचंड अशा श्रीराम भक्तांना संबोधित करण्यात आले. आराध्य असलेल्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणे हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असून हा दिवस दिवाळी सारखा साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे आवाहन मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार सुनिल मेंढे यांनी केले. सुरक्षेच्या दृष्टीने मोहाडी पोलीस ठाणेदार प्रदीप पुलावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या बंदोबस्त होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.