व्यापाºयावर गोळीबार करून ५० लाख लुटले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : स्थानीक कडबी चौकातील अतिशय गजबलेल्या परिसरात बुधवारच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एका व्यापाºयावर गोळीबार झाला. व्यापारी जखमी होऊन खाली कोसळताच हल्लेखोरांनी त्याच्याजवळील पन्नास लाख रुपये असलेली पिशवी घेऊन पळ काढला. राजू रूपचंद दीपानी (४४) रा. मेकोसाबाग असे जखमी व्यापाºयाचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. माहिती मिळताच जरीपटका ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्यासह ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सगल, पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनीही घटनास्थळी पाहणी केली. हल्लेखोरांनी लूटपाट करून नेलेली रक्कम हवालाची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. उपायुक्त कदम यांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना केले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू हे किराणा व्यापारी आहे. ते कडबी चौकातील पेट्रोल पंपच्या मागील परिसरात राहतात. मार्गावर वाहनचालकांची वर्दळ असते. इंदोºयाकडून बर्डीकडे जाणारे कवा बर्डीकडून इंदोºयाकडे जाणारे त्याचमार्गाने ये-जा करतात. बुधवारी रात्री राजू दुकानातून निघाले. त्यावेळी त्यांच्याकडे एका पिशवीत पन्नास लाखांची रक्कम होती. पिशवी दुचाकीला लटकविली आणि निघत असतानाच पाळतीवर असलेल्या दोन हल्लेखोरांनी पाठलाग करीत राजूला थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या चेहºयावर स्प्रे मारला. काही कळण्याआधीच त्याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी पाठीत, तर दुसरी खांद्याला लागली. दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि राजू खाली कोसळले. त्याच वेळी हल्लेखोर त्यांच्या डिक्कीतील पन्नास लाखांचीरक्कम घेऊन पसार झाले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप, दुकाने, खानावळ, पानटपरी, पाणीपुरी, नारळ पाण्याची दुकाने आहेत. अशा गजबजलेल्या परिसरात राजूवर गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *