
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे प्रियदर्शनी अध्यापक विद्यालय भंडारा येथिल प्राचार्या कु. आम्रपाली भिवगडे यांना समाजकार्य या विषयातील डॉक्टर आॅफ फिलॉसॉफी (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय *A Study of PsychoPhysical Status of Health Care Workar During COVID-19 Pandemic and Social Wock Intervention (Special Reference Health Care Worker at Taluka and District Hospital of Bhandara District.) असा असून हे संशोधन प्रा.डॉ. नरेश एस.कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.
या प्रबंधाला आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथील संशोधन केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. केदारसिंह रोटेले, उपाध्यक्षा डॉ. किरणताई रोटेले, कार्य.प्रा. नरेश कोलते,प्रा.डॉ. हेमंत देशमुख, प्रा. अमोलसिंह रोटेले, प्रा.डॉ. देवेंद्र सोनटक्के यांनी अभिनंदन केले.