मकरधोकडा येथे शेतातील लाखोंच्या झाडांची सर्रास कत्तल

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील टेकेपार येथील शेतकरी शालीकराम चेपा पडोळे (हल्ली मुक्काम सिल्ली) यांची गट क्र. १७२, १७८/१ व १७३/१ असे तीन गटात मकरधोकडा हद्दीत शेती आहे. शेतावर जुनी आणि मोठी अशी लाखों रुपयाची झाडे होती. मात्र सर्वच्या सर्व १० झाडे अज्ञातानी तोडून नेल्याची बाब उघडकीस आली. झाडे कोणी तोडली? याचा तपास करून तोडलेली झाडे परत मिळण्यासाठी पिडीत शेतकरी यांनी वन विभाग कार्यालय तसेच पोलीस स्टेशन कारधा येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र तपास अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेती बाहेरगावी मकरधोकडा येथे असल्याने वृद्ध शेतकरी शालिकराम पडोळे यांचे रोज शेतावर जाणे होत नाही. मात्र गत आठवाड्यात मुलगा फुलचंद पडोळे शेतावर गेला असता, सर्वच्या सर्व १० ही झाडे बुडापासून तोडल्याचे लक्षात आल्याने शेतकºयाला धक्का बसला आहे. शालिकराम पडोळे हे वयोवृद्ध असून रोज शेतावर जात नाही. हीच संधी साधून काही आज्ञातानी शेतावरील सागवन – २, खैर – ४, किन्ही -३, बाभूळ – १ अशी एकूण १० झाडे तीही मोठी झाडे तोडून नेली, त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत १६ डिसेंबरला वनपरिक्षेत्राधिकारी व वनपरिक्षेत्र वन विभाग भंडारा यांना तसेच पोलीस स्टेशन कारधा येथे रीतसर तक्रार दाखल केली. मात्र झाडे कोणी तोडली याचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे लवकर तपास करून लाखों रुपयाची झाडे तोडून नेणाºया चोरांचा छडा लावून दंडात्मक कार्यवाही करण्याची शेतकरी शालिकराम पडोळे व मुलगा फुलचंद पडोळे यांनी मागणी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *