मनरेगा बचावसाठी काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सन २००५ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग जी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने लागू केली होती मनरेगा योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला रोजगार देण्याची हमी देण्यात आली होती मागणी केल्यानंतर १५ दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची जवाबदारी राज्य शासनाची होती. मनरेगा अंतर्गत दरवर्षी देशभरातील सुमारे ५ ते ६ कोटी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रद्द करून विकसित भारत गॅरंटी भार रोजगार अँड उपजीविकी मिशन ग्रामीण अधिनियम अमलात आणण्याचे ठरविले आहे.

या नवीन कायद्यामुळे कामाच्या अधिकारांवर याप्रमाणे हमले केले आहे. मनरेगा मध्ये १०० दिवसाची कामाची कोणतीही हमी नाही. मनरेगा मध्ये ग्रामसभेला अधिकार होते श्इॠफटॠ मध्ये शासनाकडून गांव निवडले जातील . मनरेगा मध्ये पूर्ण कामाची मागणी करता येत होते. या कायद्यात शासनाने निश्चित केलेल्या वेळेस काम मिळेल. मनरेगा मध्ये मजदूरी ची गॅरंटी होती यामध्ये शासन आपल्या मजीर्ने करण्यात येईल. मनरेगा पंचायत अधिकार होते नवीन कायद्यात सरकार ठेकेदारा मार्फत काम करेल. मनरेगा मध्ये १०० % खर्च केंद्र सरकार करत होते त्यामुळे राज्य सरकार बिनधास्त पणे कामे मंजूर करत होते. पण या नवीन कायद्यामध्ये केंद्र सरकारचे ६०% व राज्य शासनाचे ४०% खर्च करावा लागणार आहे.

या कायद्यात रोजगार सेवक सुद्धा रद्द होणार आहेत . या मनरेगा बचाव अभियानाच्या माध्यमातून कामाची गॅरंटी, मजदूरी ची गॅरंटी, कामाचा संविधानिक अधिकार व ४०० रुपये न्यूनतम मजुरी या मागणी करिता भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात येत आहे तसेच यानंतर सुद्धा तालुका पातळीवर व ग्रामपंचायत स्तरावर अश्या प्रकारचे जन जागरण व आंदोलन करण्यात येणार आहेत. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, नगर सेवक गजानन बादशाह, जिल्हा परिषद सदस्य अनिता भुरे,रिजवान काजी, सुभाष आजबले, देवाभाऊ इलमे, सुरेश ब्राम्हणकर, उत्तम भांगडकर, मनोज बागडे, जगदीश उईके, शंकरभाऊ तेलमासरे, मोहित मोहरकर, धर्मेंद्र नंदरधने, राजू निर्वाण, नरेंद्र वाघाये, भगवान नवघरे, भुमेश्वर महावाडे, क्रिष्णकांत बघेल, पृथ्वी तांडेकर, कान्हा बावनकर, अशोक कापगते, तुलशीदास बिलवने, गोविंद हुकरे, प्रमोद मानापुरे, अभिजित वंजारी, जगदीश ऊईके, बाळा ठाकुर, प्रमोद तितीरमारे, सुरेश मेश्राम, श्रावण लांजेवार, विपीन बोरकर, सेवक कोरे, हेमराज डोकरे, पुंडलीक पाऊलझगडे, विकास राऊत,लखन चौरे, अशोक कापगते, नवाब पटेल, नरेंद्र साकुरे व अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *