दुचाकीची उभ्या ट्रकला धडक; युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी चालकाने मागील बाजुने जोरदार धडक दिली. त्यात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संकेत सपाटे असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत सपाटे हा पहाटेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भंडारा येथून लाखनीकडे जात होता.

धारगाव जवळ पोहचला असता मुंबईकोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकलात्याच्या स्कूटीने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संकेत स्कुटीवरून खाली कोसळला. ही धडक इतकी जोरदार होती की संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावर उभ्या राहणाºया जड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *