
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर आणि मोहाडी तालुक्यात कोळसा वाहतूक करणाºया एकाच ट्रकमुळे एका तासात दोन अपघात घडले आहेत. पहिला अपघात तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीवरील पुलावर २४ जानेवारी पहाटे ५ वाजता दरम्यान घडला. तर दुसरा मोहाडी तालुक्यातील काटेब्राह्मणी येथे घडला आहे. तुमसरकडे दुचाकीने येत असलेल्या युवकाला तिरोड्याकडून कोळसा घेऊन जाणाºया ट्रकने जोरदार धडक झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव अमोल खोब्रागडे रा. देव्हाडा असल्याची माहिती आहे. अमोल हा सनμलॅग कंपनीमध्ये कंत्राटी कामगार असल्याचे सांगितले जात आहे अमोल हा विवाहित असुन त्याला तीन महिन्याची मुलगी आहे. धडक दिलेल्या वाहनांची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल खोब्रागडे याच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या तीन महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. घराचा कर्ता पुरुष आणि नुकताच बाबा झालेल्या अमोलचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने खोब्रागडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरातून तीव्र संवेदना व्यक्त होत आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
दुसरा अपघात मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी येथे घडला. पहिल्या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाने मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅग्नीजने भरलेल्या ट्रकला धडक दिली. हा ट्रक यासीन छवारे यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. दुसºया अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तिरोडा भागातून येणारे ओव्हरलोड आणि भरधाव वेगाने धावणारे कोळशाचे व वाळूचे ट्रक नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने स्थानिक परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.