राज्यात आजपासून अवकाळी पावसाचे संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर होणाºया वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी ३० मार्चला प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे.

पावसाचा मुख्य अंदाज असा

सोमवार, ३० मार्चच्या तुलनेत मंगळवारी ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर बुधवार १ ते शनिवारी ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

कृषी विभागाचे शेतकºयांना आवाहन

मार्चच्या माध्यान्हत पडून गेलेल्यापावसाने शेतकºयांचे खूप मोठे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा हवामानाचे बदलणारे रूप शेतकºयांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाक- डून करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *