
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत प्रशासनाकडून केला जाणारा भेदभाव आणि खतांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यावरून माजी आमदार चरण वाघमारे यांनी सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत टीका केली आहे. शेतकºयांची लूट थांबवण्यासाठी आता शेतकºयांनीच संघटित होऊन जागेहोण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.