
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया पिंपळगाव ( नि.) येथील बाबा हेमदास किसन बावणे वय ५५ वर्ष मोहिनी करुन पळून जाणाºया मुलींना थांबविण्याचा दावा करणाºया ढोंगी बाबाचा भंडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे केला.या ढोंगी बाबा त्विरुद्ध अड्याळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर असे की, पिंपळगाव (नि.) येथील रहिवासी हेमदास किसन बावणे वय ५५ वर्ष हा कीर्तन, प्रवचन करीत होता. त्याचबरोबर आपल्या भक्तांना तंत्र मंत्र करून मुलगी पळाली की तिला घरी आणण्यासाठी मोहिनी करून देण्याचा दावा करीत होता.जमिनीतील सोने कजलीद्वारे काढून देण्याचा दावा करीत होता. पळून गेलेली मुलगी हमखास घरी येईल असा दावा करून सुरुवातीला ७५०० ते ८००० हजार रुपये नगदी घेत होता.
एक पायली तांदूळ, एक बॉटल पाणी तंत्र मंत्र करून देत होता. काही वेलांची चुंबळ तयार करून मुलीच्या आंघोळीच्या वेळी पाण्याखाली ठेवण्यास सांगत होता. ती मुलगी कुठे जाणार नाही व पळून गेली तरी आपल्या घरी परत येईल असा दावा हा बाबा करीत होता. शिवशंकर रामकिसन डोरले यांच्या मुलीचे एका मुलावर प्रेम होते. मुलगी घरी बरोबर राहत नसल्यामुळे शिवशंकर डोरले यांनी या बाबाला आपली परिस्थिती सांगितली.त्याचा फायदा घेत या बाबाने त्यांना सांगितले की, मी मोहिनी करून देतो तुमची मुलगी कुठे जाणार नाही याची गॅरंटी देवून विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ८००० हजार रुपये घेतले. यानंतरही मुलगी थांबली नाही आणि तिने प्रेम विवाह केला. मुलगी घरून निघून गेली त्यामुळे डोरले हे पुन्हा या बाबाकडे गेले झालेली घटना सांगितली.
या बाबाने एक लाख रुपये, घेऊन ये मी दुसरी मोठी मोहिनी करून देतो आणि तुझ्या पोरीला शंभर टक्के घरी आणून देतो अशी गॅरंटी दिली. डोरले यांनी बाबाला पैसे नेऊन दिले नाही. तेव्हा या बाबाने डोरले यांना फोन करुन लवकर पैसे घेऊ ये नाहीतर तुझी पोरगी मरेल किंवा काहीतरी होईल अशी भीती दाखवली. तुला विश्वास नसेल तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असे सांगून २३/३/ २०२५ ला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले व एक लाख रुपये घेतले. मात्र मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे डोरले यांनी पैसे परत करण्याची बाबाकडे मागणी केली. बाबाने पैसे परत करण्यास साफ नकार दिला. काय करायचे ते करून टाक अशी उलट धमकी दिली.
शिवशंकर रामकृष्ण डोरले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे सविस्तर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विष्णुदास लोणारे ,नितेश बोरकर, नरहरी नागलवाडे, चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने, तसेच अर्जदार यांनी अडयाळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांची भेट घेतली . सविस्तर चर्चा केली तक्रार दिली. मअंनिसचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी या बाबाच्या दरबारात जाऊन सांगितले की माझी मुलगी दुसºया मुलाच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा या बाबाने मोहिनी करून देवून मुलगी घरी येईल व प्रेमातून बाहेर पडेल याची गॅरंटी देवून त्यासाठी ७५०० रुपये द्यावे लागतील असे सांगितले. शंभर रुपये घेतले ढोंगी बाबाला लोणारे यांना मुलगीच नाही हे ओळखता आले नाही तसेच उपस्थित लोक अंनिसचे कार्यकर्ते हे ओळखता आले नाही. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी ढोंगी बाबा हेमदास किसन बावने विरुद्ध भारतीय न्याय संहिता( बी एन एस )२०२३ कलम ३१८(४) सह कलम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमाणूष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार धनंजय पाटील यांनी या ढोंगी बाबाला ताब्यात घेतले.