
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : अनेक दिवसांपासून पवनी नगर परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालविल्या जात असून शैक्षणिक दर्जा कायम ठेवण्यात आला. चालू सत्रात सदर विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकावर असल्याने नियमित करण्यासाठी नगर परिषद प्रशासन उदासीन आहे का ? असा प्रश्न शिक्षणप्रेमींना पडला आहे. पवनी नगर परिषद इंग्रजकालीन आहे. दरम्यान नगर परिषद ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. एक दजार्वान विद्यालय म्हणून कॉलेज नावारूपास आले. अनेक प्रशिक्षित व्याख्याते विद्यालयाची जमेची बाजू होती.
सिनिरिटीनुसार मुख्याध्यापक बदलत गेले. त्यांना नगर प्रशासनाने कायम पदभार दिला होता. मागील ९ सप्टेंबर २०२५ पासून रविंद्र बिलवणे यांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आला. मात्र कार्यात कर्तव्य पारायणता असून देखील त्यांना कायम करण्यात आलें नसल्याने नगर प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर जनतेनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शैक्षणिक प्रणाली विकसित करण्यावर उमेदवारांनी मागील निवडणुकीत जाहीरनामा प्रकाशित करून मते मिळविण्यात धन्यता मानली. मतदारांनीही विजयासाठी भरभरून मते पारड्यात टाकली. याचा विसर नगर परिषदसत्ताधाºयांना पडला आहे का ? अशी बोलकी प्रतिक्रिया नगर वासींयात चर्चिल्या जात आहे. प्रभारी मुख्याध्यापकामुळे अनेक शासकीय कामात अडथळे येऊ नयेत म्हणून हे पद कायम करण्याची मागणी शिक्षणप्रेमींसह जनतेनी केली आहे.