आमगाव येथील बिडी कामगार दवाखाना बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लोकांचा संताप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बिडी उद्योग हा मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची उपजीविका बिडी बनविण्यावर अवलंबून आहे. बिडी कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालया मार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी बिडी कामगार दवाखाने कार्यरत आहेत. अशाच प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात सुरू असलेल्या बिडी कामगार दवाखाना बंद करण्याचा निर्णय श्रम व रोजगार मंत्रालयाने घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक बिडी कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आमगाव येथील या दवाखान्यात सध्या जवळपास ५ हजार आॅनलाईन नोंदणीकृत बिडी धारक कामगार उपचार घेतात, तर सुमारे १२ हजार बिडी कामगार अद्यापही आॅनलाईन नोंदणी पासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे.

दररोज साधारण २० ते २५ रुग्ण या दवाखान्यात उपचारासाठी येतात. या दवाखान्या मार्फत बिडी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अशा महत्त्वाच्या सेवा सुरू असताना हा दवाखाना बंद करून सेवा गोंदिया येथे हलविण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका बिडी कामगार यांनी मांडली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू, अशी ठाम भूमिका स्थानिक बिडी कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि श्रम व रोजगार मंत्रालय याबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी बिडी कामगार प्रतिभा भालाधरे, भाऊलाल गिºहेपुंजे, रेखा रिनायत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच दवाखान्यातील फार्मसिस्ट मनोज दथानी आणि खासदार प्रतिनिधी दुष्यंत किरसान यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *