
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा अधिवक्ता संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भंडारा अर्बन बँकेचे संचालक अॅड. प्रभातकुमार मिश्रा यांनी आज आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाने संघटनात्मक कामांना गती मिळण्याची आशा आमदार भोंडेकर यांनी व्यक्त करीत अॅड. प्रभातकुमार मिश्रा यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी गेल्या काही काळात भंडारा पवनी विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्यांचा सपाटा लावला. ज्या मुळे भविष्यात या क्षेत्राचा चेहरा मोहरच बदलणार आहे. या विकास कामांना बघता लोकांचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ही वाढत जात आहे. याच कामांनी प्रभावित होवून भंडारा अधिवक्ता संगठ्नेचे माजी अध्यक्ष आणि भंडारा अर्बन बँकेचे संचालक अॅड. प्रभातकुमार मिश्रा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
अॅड. प्रभातकुमार मिश्रा यांनी सांगितले कि त्यांना गेल्या काही काळात अन्य विकास विरोधकाच्या बोलण्यावरून गैर समज झाला होता, परंतु आता शहरच नाही तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत असलेली विकास कामे समोर येत असल्याने त्यांना सत्य काय ते समजले आहे. ते म्हणाले कि या पूर्वी सुद्धा अनेक आमदार या क्षेत्राला मिळाले परंतु भंडारा विधानसभे करिता इतकी कामे कुणीच केली नाही. आज भंडारा विधानसभेचा वैश्विक स्तरावर विकास करून भंडाºयाला जगाच्या पाठीवर नवीन ओळख मिळवून देण्याचे आम. भोंडेकर यांचे ध्येय आहे आणि ते लवकरच पूर्ण होतांना सुद्धा दिसत आहे. आम. भोंडेकर यांनी आणलेली सर्व कामे पूर्ण झाली कि भविष्यात शारातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यतील नागरिकांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांच्या याच दूरदृष्टीने प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. सोबतच श्री मिश्रा म्हणाले कि आत्ता ते शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी काम करणार. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, जिल्हा संघटक नितीन धकाते, शहर प्रमुख रोशन काटेखाये, उद्योजक अभय भागवत आदि उपस्थित होते.